राहुरी फॅक्टरीत अकोलेतील अगस्ती महाराज पायी दिंडीचे स्वागत

राहुरी फॅक्टरीत अकोलेतील अगस्ती महाराज पायी दिंडीचे स्वागत
राहुरी तालुका जावेद शेख
टाळमृदूगांच्या निनादात, कपाळी बुक्का,गळ्यात तूळशीची माळ, हातात भगवी पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर फुलांनी सजविलेले तूळशीवृंदावन घेऊन मुखी पांडुरंगाचा नाम जप सुरु असलेल्या महिला भगिनी आणि पुष्पहारांनी सजविलेल्या पालखी रथातून अकोले येथील अगस्ती ऋषि महाराजांची पायी दिंडी पांडुरंगाच्या भेटीला आषाढीवारीसाठी निघाली असून आज राहुरी फॅक्टरीतील पावन गणपती प्रतिष्ठाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी श्रीरामपूर नाका परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचे पुजन करून दिंडीचे व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी डीजेच्या निनादात व टाळ मृदुंगाच्या गजरात नूतन माध्यमिक विद्यालयाचे विध्यार्थी व गुरुकुल वसाहत परिसरातील नागरिकांनी चांगलाच ठेका धरला होता.
तदनंतर पावन गणपती मंदिर प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला.प्रसंगी हजारो वारकर्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी अगस्ती महाराज दिंडी सोहळ्यातील दिपक महाराज देशमुख यांच्यासह संत मंडळींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उपाध्यक्ष अरुण गायकवाड, गोपाल शिंदे, राजेंद्र सोनटक्के,विलास अल्हाडे,बाळासाहेब भालेराव, शंकर गावडे,पंकज ढुमणे,सुभाष कोंडेकर, नंदकिशोर काळाने, नामदेव पेरणे, मनोज अल्हाडे,पारस नहार, गणेश शेजुळ, सतीश संसारे,संतोष राऊत,संतोष जोशी,पद्माकर निघूते, राजेंद्र जोशी आदिंसह परीसरातील माता भगिनी व भाविक भक्त उपस्थित होते.