Breaking
ब्रेकिंग

शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉ धर्मराज सुरोसे यांना जाहीर…

0 3 9 0 5 3

शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉ धर्मराज सुरोसे यांना जाहीर…

राहुरी अहमदनगर वृत्तसेवा :   जावेद शेख

महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्याच सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा ” राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार ” शेवगाव येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे संयोजक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ धर्मराज एकनाथ सुरोसे यांना जाहीर झाला असल्याचे निवडीचे पत्र संजीवनी फाउंडेशनचे चेअरमन डॉ ज्ञानेश्वर सानप यांनी ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमासाठी मा. ना.माणिकराव कोकाटे (कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य ) खासदार भाऊसाहेब वाकचौरे, रविकांतजी तुपकर,( वस्त्रोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य )आ अमोलजी खताळ, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, विकास नवाळे (आयुक्त महानगरपालिका संभाजीनगर ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सिन्नर या ठिकाणी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
डॉ धर्मराज सुरोसे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले,खासदार डॉ अमोल कोल्हे ,नामदार रामजी शिंदे, नामदार राधाकृष्ण विखे,नामदार अतुलजी सावे,नामदार जयकुमार गोरे, आ.मोनिकाताई राजळे आ. विक्रमसिंह पाचपुते,आ.शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,अभय आगरकर,माणिकराव विधाते सर,आदी मान्यवरांनी डॉ धर्मराज सुरोसे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे