Breaking
ब्रेकिंग

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ कळंब आयोजित नशा मुक्त व सशक्त भारत अभियान उत्साहात संपन्न

0 3 9 0 4 0

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ कळंब आयोजित नशा मुक्त व सशक्त भारत अभियान उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८/ सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार, सौजन्य सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सोलापूर आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित नशा मुक्त भारत अभियान हा उपक्रम रण सम्राट क्रीडा मंडळ कळब संचालित, शहीद भगतसिंग प्राथमिक विद्या निकेतन
कळंब जिल्हा धाराशिव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास 243 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि 11 स्टाफ यांनी नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान मध्ये सहभाग नोंदवला. या अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना नशे पासून होणारे दुष्परिणाम समजून सांगितले आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन आणि गैरवर्तन आपल्या हातून घडणार नाही याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.

नशा मुक्त असणे ही काळाची गरज आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवले पाहिजे, आपले घर आणि शाळा ही विद्यार्थ्यांचे संस्कार धाम आहेत. तिथे विद्यार्थ्यांचे चांगल्या पद्धतीने जडणघडण होत असते. तरीपण सभोवतालची परिस्थिती अनुकूलच असेल असे नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांनी प्रलोभनाला बळी न पडता आपले जीवन घडवावे असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.

नशा मुक्त भारत होणे ही जशी काळाची गरज आहे तसेच सशक्त भारत ही पण काळची गरज आहे यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज अर्धा तास बेसिक व्यायाम केला पाहिजे त्या व्यायामाचे बेसिक ट्रेनिंग ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी प्रत्यक्ष कृती करून विद्यार्थ्यांकडून करून घेतले. श्वास आणि शरीराची क्रिया कशी असावी याबद्दल महेश वैद्य यांनी सर्वांना प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन केले. यामध्ये शिक्षकांनी देखील सहभाग नोंदवला होता.

या उपक्रमास रोटरी क्लबचे ऑफ कळम सिटीचे अध्यक्ष श्री अरविंद शिंदे सर यांनी सहकार्य केले आणि मित्रवर्य पत्रकार श्री मंगेश यादव हे उपक्रमास आवर्जून उपस्थित राहिले.
मुख्याध्यापक श्री एच एस शेळके सर यांनी उपक्रमास तात्काळ मान्यता दिली आणि अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी प्रेरणादायक आहेत तरी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे हे अत्यंत आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी महेश वैद्य यांना सन्मान पत्र देऊन गौरव केला.
नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांचे तसेच रोटरी क्लबऑफ कळब सिटी चे आभार मानले. मित्रवर्य किसन कांबळे सर करमाळा, मार्गदर्शक श्री दिनेश सोरटे, ग्राहक पंचायत राजचे संजय मोरे, उद्योजक महेश दोशी, प्रताप कांबळे यांनी फोन वरून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. गुरुवर्य विनोद कुमार गांधी यांचे आशीर्वाद कायम सोबत आहेतच.

या कार्यक्रमाची प्रेरणा स्त्रोत आई वनमाला बबनराव वैद्य आहे असे भावनात्मक प्रतिक्रिया महेश वैद्य यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
हा उपक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व्यायाम केला आणि नशा मुक्त भारत ची शपथ महेश वैद्य यांनी सर्वांना दिली.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग यांचे गुरु क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांना स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे