Breaking
ब्रेकिंग

सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात कोतकर कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता

0 8 6 5 0 8

सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात कोतकर कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता

नेवासा /  प्रतिनिधी 

नेवासा तालुक्यातील बाभुळवेढे येथील सरपंच बाबासाहेब कोतकर व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात नेवासा न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.१९ नोव्हेंबर २०१९ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ७२४/२०१९ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६, ३२४, ३५४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये बाबासाहेब कोतकर, विकास कोतकर, छाया कोतकर व राजश्री कोतकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध नेवासा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाचे साक्षीपुरावे, कागदोपत्री पुरावे तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयासमोर झाला. आरोपींच्या वतीने अॅड. पांडुरंग औताडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, तर त्यांना कमलेश बाबासाहेब नवले पाटील यांनी सहाय्य केले.उपलब्ध साक्षीपुरावे, कागदोपत्री पुरावे आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचे सखोल परीक्षण केल्यानंतर आरोपींविरुद्धचे आरोप शंकातीतरीत्या सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सबळ व विश्वासार्ह पुराव्याअभावी बाबासाहेब कोतकर, विकास कोतकर, छाया कोतकर व राजश्री कोतकर यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय नेवासा न्यायालयाने दिला.या निकालानंतर कोतकर कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, बचाव पक्षाचे कामकाज अॅड. पांडुरंग औताडे यांनी पाहिले, तर त्यांना कमलेश बाबासाहेब नवले पाटील यांनी मोलाचे सहाय्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे