स्नेहबंध’ फौंडेशनच्या वतीने ‘नवरात्र उत्सवानिमित्त’ जिल्हास्तरीय १२ वर्षाखालील मुला मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा २०२५
‘स्नेहबंध’ फौंडेशनच्या वतीने ‘नवरात्र उत्सवानिमित्त’ जिल्हास्तरीय १२ वर्षाखालील मुला मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा २०२५
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हास्तरीय १२ वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी आपले पूर्ण नाव, वय, पत्ता व मोबाईल नंबर ०२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ८७ ९३ १९ १९ १९ या क्रमांकावर नुकताच मोबाईलवर काढलेला फोटो पाठवावा. पहिला गट वय १ ते ५ वर्षे व दुसरा गट ६ ते १२ वर्षे असा असेल. (फोटो जुना व फोटो कॅमेरा मधील फोटो चालणार नाही.)
स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून दोन्ही गटातील पहिल्या ३ / ३ स्पर्धकांना मान्यवरांचा उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. मागील पारितोषिक विजेत्यांना स्पर्धेत प्रवेश नाही. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.


