Breaking
ब्रेकिंग

दुय्यम निबंधक वर्ग २ अहिल्यानगर २ व ३ या कार्यालयामधील अनागोंदी, भ्रष्टाचार होत असलेबाबत चौकशी करा-आनंदराव शेळके

0 8 6 7 0 5

दुय्यम निबंधक वर्ग २ अहिल्यानगर २ व ३ या कार्यालयामधील अनागोंदी, भ्रष्टाचार होत असलेबाबत चौकशी करा-आनंदराव शेळके

प्रतिनिधी : महेश कांबळे

नगर-येथील दुय्यम निबंधक वर्ग २ अहिल्यानगर २ व ३ या कार्यालयामधील अनागोंदीची चौकशी करा अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख नगर दक्षिणआनंदराव शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गीते यांना दिले यावेळी पोपट पाथरे,पांडुरंग घोरपडे,बापू काकडे,राजेंद्र सावळे,सुनील भिंगारदिवे,बबनराव कर्डिले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते

निवेदनात म्हटले आहे कि दुय्यम निबंधक प्रत्येक ऑफीसला रकम रु. १० लाख ऑफीस नूतनीकरणासाठी आलेले रकम दि. २८/०४/२०२५ रोजी ऑफीस रिपेअरिंग नूतनीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असलेबाबत चौकशी करावी कि ऑफीस रिपेअरिंग नूतनीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला दिसत आहे. नूतनीकरण करत असताना नियमाप्रमाणे टेंडर काढावयास पाहिजे होते. ते टेंडर किती लोकांचे मागविण्यात आले आहे किंवा ते टेंडरबाबत कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात दिली गेली याची माहिती मिळावी. तसेच शासकीय स्ट्रक्चरल ऑडीट करावे, ऑडीट झाल्याची प्रत मिळावी,

तसेच दुय्यम निबंधक वर्ग २ अहिल्यानगर २ व ३ या कार्यालयामध्ये दस्त नोंदविताना हायवेवरील जमिनीला शेती रेडीरेकनर रेट लावून दस्तऐवज नोंदविलेले आहे.तसेच कोणताही शासननिर्णय नसताना शेतजमिनीचे तुकडे करुन सर्रास खरेदी केली जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होते. त्यामध्ये गोरगरीब जनतेची मोठी पिळवणूक केली जाते. यानंतर तलाठी ऑफीसमध्ये नोंदी घेतल्या जात नाही. या दुय्यम निबंधकाचे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून यांच्या दस्ताऐवजाची कार्यकालातील तपासणी करुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. यामध्ये अहिल्यानगर २ व ३ मधील दुय्यम निबंधकांनी मोठी माया जमवलेली असून यांच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी करुन या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही करुन निलंबित करावे व जे शासनाचे नुकसान केले आहे, ते त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे.

तसेच वरील कार्यालयाशी तोंडी तक्रार केली असता तेथील अधिकारी सर्व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे त्यांची मोनोपोली/मक्तेदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शासकीय ऑफीस स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखे जनतेशी वागतात.सदर गट नं. ३७ हिवरेझरे आनंदराव शेळके यांचे खरेदीचा व्यवहार झालेला आहे.शासकीय नियमाप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरलेली असूनसुद्धा एजंटमार्फत (लेखनिक) रु. ५०००/-रकम अनधिकृत घेण्यात आल्यानंतरच सही देण्यात आली. अशा प्रकारे भ्रष्टाचार केला जात आहे.

सदरील प्रकरणी मुद्रांक शुल्क अधिकारी यांना माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मा.पालकमंत्री, ना. राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या आम्ही जवळचे आहोत, अशा प्रकारे धमकी देण्याचा प्रयत्न केला. मा. ना. अशा भ्रस्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत नाही.तरीसुद्धा त्यांची या प्रकरणी बदनामी केली जात आहे. या अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात याची. एकूण झालेल्या कामांची बिले ही जिल्हाधिकारी साहेब यांना दाखविण्यात यावीत. तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित सहाय्यक निबंधक वर्ग -२, अहिल्यानगर यांचेवर व इतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी .

सदर प्रकरणाची योग्य कायदेशीर चौकशी न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.निवेदनाच्या प्रति . पालकमंत्री,अहिल्यानगर,महसूल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे,नोंदणी महानिरीक्षक पुणे (IGR) महाराष्ट्र राज्य, सहजिल्हा निबंधक वर्ग १, व मुद्रांक जिल्हाधिकारी तथा अपीलिय अधिकारी, अहिल्यानगर यांना देण्यात आल्या आहेत .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे