Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील आगीतून बचावले*

0 4 0 3 8 5

*माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील आगीतून बचावले*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर येथील माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्या न्यू प्लॉट भागातील निवासस्थानाला १२ रोजी दुपारी ४:३० वाजता स्टोअर रूम मध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. डॉ. पाटील शेजारीच रूम मध्ये झोपले होते.त्यांना या आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ते पटकन रूम बाहेर पडले असता सर्वत्र काळाकुट्ट धूर पसरलेला होता. त्यांनी तात्काळ पत्नी सुनीता पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, संदीप सोनवणे यांना संपर्क करून घटनेबाबत माहिती दिल्यामुळे त्यांनी मिळून लगेच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले होते. त्याचबरोबर महावितरण विभागाने देखील तात्काळ अपार्टमेंटचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. मुख्याधिकारी तुषार नेरकर व गणेश गोसावी यांनी तात्काळ अग्निशमन बंब पाठवला. अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे ,फारुख शेख , जफर पठाण , आकाश संदानशिव यांनी आग आटोक्यात आणली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे