Breaking
ब्रेकिंग

कुताळमळा (गुंडेगाव) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन…

हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघणार कुताळमळा; १८ डिसेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताह....

0 7 6 9 3 4

कुताळमळा (गुंडेगाव) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन…

हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघणार कुताळमळा; १८ डिसेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताह….

गुंडेगाव /  प्रतिनिधी : संजय भापकर

अहिल्यानगर तालुक्यातील *गुंडेगाव कुताळमळा परीसरातील येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने प्रथमच अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दि.१८ डिसेंबर २०२५ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून, दररोज हरीपाठ रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तनसेवा होणार आहे.*
या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होत असून, ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज बनकर, ह.भ.प. तुळशीराम महाराज लबडे, ह.भ.प. अशोक महाराज पिंपरकर, ह.भ.प. दादा महाराज वायसळ, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, ह.भ.प. स्वरभुषण कृष्णा महाराज राऊत, ह.भ.प. भगवान महाराज शिंदे ,आदी संत-महात्म्यांची कीर्तनसेवा लाभणार आहे. याशिवाय गोड आवाज गायनार्च ह.भ.प नागेश महाराज नानकिल्ले ( हिंगोली वैभव), अनिरुद्ध महाराज नालेगावकर, मृंदुगचार्य ह.भ.प अवधेष महाराज राऊत यांची साथसंगत लाभणार आहे या
सोहळ्याच्या सांगता निमित्ताने दि *. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वा. ह.भ.प. योगीराज महाराज पवार शास्त्री (श्री.संगमेश्वर देवस्थान, तिळापूर) यांच्या काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जय मल्हार मित्र मंडळ, कुताळमळा (गुंडेगाव) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अखंड हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे