Breaking
ब्रेकिंग

आनंदाचे डोही आनंद तरंग ; गुंडेगाव येथील रामवाडीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

गुंडेगावात संपूर्ण श्रावण महिन्यात साजरा केला जातो हरिनाम सप्ताह...*

0 7 6 9 4 3

*आनंदाचे डोही आनंद तरंग ; गुंडेगाव येथील रामवाडीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

*गुंडेगावात संपूर्ण श्रावण महिन्यात साजरा केला जातो हरिनाम सप्ताह…*

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव संपूर्ण परिसर अनेक ऋषी महात्म्यांच्या दीर्घ साधनेने पवित्र आहे.अशा महात्म्यांपैकी गुंड ऋषी,मांडव्य ऋषी,संत बुवाजीबुवा, संत महिपती महाराज,संत देवदैठणचे निंबराज महाराज,पुंडे वाहीरेचे शेख महंमद महाराज अशा सिद्धमहात्मे गुंडेगाव भूमित प्रसिद्ध असून येथील रामवाडी या ठिकाणी श्रावण मासानिमित्ताने हनुमान मंदीरात ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह ह.भ.प.साहेबराव भापकर महाराज,ह.भ.प.संभाजी महाराज भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे शनिवार दिनांक ९ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले असून यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्‍ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.
या काळात पहाटे ४ ते ५ वा. काकड आरती, सकाळी ७ ते११ वा. संत ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन ५ ते ६ करण्यात येते,सांयकाळी ६ ते ८ हरिपाठ, संध्याकाळी ९ ते ११ या वेळेत प्रसिद्ध असलेल्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडत आहेत यामध्ये ह.भ.प. भिवसेन महाराज हराळ (गुंडेगाव)अध्यक्ष नगर तालुका वारकरी संघ.,ह.भ.प. संभाजी महाराज भापकर (गुंडेगाव)ह.भ.प. भरत महाराज जोगी (परळी वैजनाथ)ह.भ.प. माऊली महाराज म्हस्के (चांहगाव)ह.भ.प. योगीराज महाराज पवार, (भागवताचार्य, तुळापुर)ह.भ.प. बाळकृष्ण महाराज महाडिक (वलघुड)ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल (कडा), यांची किर्तन सेवा होणार आहे.तसेच गायनाचार्य ह.भ.प. अजय महाराज खैरनार, ह.भ.प. आकाश महाराज पारखे (आळंदी देवाची)मृदंगाचार्य ह.भ.प. किरण महाराज जाधव (आळंदी देवाची) पेटीमास्तर ह.भ.प. भिवसेन महाराज, मंगेश हराळ,विणेकरी ह.भ.प. पोपट पर्वती भापकर, ह.भ.प. हरिश्चंद्र बाबुराव जाधव,भालदार ह.भ.प. नारायण चंद्रभान भापकर, चोपदार ह.भ.प. पोपट पर्वती भापकर यांचीही संगत असुन शनिवार दि. १६/०८/२०२५ रोजी सकाळी ठीक ९. वा. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली आळंदी देवाची) यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
यावेळी वारकरी धर्माचे आचरण करणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.तसेच दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून यावेळी टाळ मृदूंगाच्या तालावर पावल्या तर महिला भाविक फुगड्या खेळात आनंदोत्सव साजरा करत आहेत.या कार्यक्रमासाठी समस्त भजनी मंडळ,रामवाडी,हराळमळा,कुतामळा, हनुमान तरुण मंडळ,जय बजरंग तरुण मंडळ तसेच समस्त रामवाडी हराळमळा कुताळमळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे