Breaking
ब्रेकिंग

आदर्श ज्येष्ठ माता रखमाबाई बाजीराव भापकर यांचे निधन…

0 7 6 9 3 4

आदर्श ज्येष्ठ माता रखमाबाई बाजीराव भापकर यांचे निधन…

गुंडेगाव /  प्रतिनिधी :

अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील आदर्श ज्येष्ठ माता कै. रखमाबाई बाजीराव भापकर (वय ९७) यांचे शुक्रवार दिनांक २०/०२/२०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कै. रखमाबाई भापकर या भापकर कुटुंबातील आदर्श ज्येष्ठ माता म्हणून सर्वपरिचित होत्या. कष्टाळू, शांत व संयमी स्वभावामुळे त्यांना गावात मानाचे स्थान होते. शेती क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. पारंपरिक शेती पद्धतीत सुधारणा करून फळशेतीकडे वळण्याचा दूरदृष्टीपूर्ण सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या दोन्ही शिक्षित मुलांनी माळरानावर फळशेती फुलवून शेतीत नवे यश संपादन केले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रंभाबाई झेंडे, केसरबाई धावडे, सरस्वती माळवदकर व संगीता शेलार या त्यांच्या चार मुली होत. त्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे माजी संस्था निरीक्षक प्रा. रंगनाथ भापकर (तात्या सर) तसेच गुंडेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामदास भापकर यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनाने भापकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याची व मार्गदर्शनाची आठवण गावकऱ्यांच्या मनात कायम राहणार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक ०१/०३/२०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता गुंडेगाव हराळमळा अमरधाम येथे होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे