Breaking
ब्रेकिंग

जनता विद्यालयाचे ज्ञानवर्धिनी परीक्षेत यश

0 8 6 5 6 0

जनता विद्यालयाचे ज्ञानवर्धिनी परीक्षेत यश

वाळकी प्रतिनिधी :   दादासाहेब आगळे

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर या संस्थेमार्फत जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते.या परीक्षेत जिल्हाभरातून विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. इयत्ता सहावी व सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन जिल्हास्तरावर केले जाते. आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व भविष्यात द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी ज्ञानवर्धिनी ही परीक्षा उपयुक्त ठरावी या हेतूने संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जनता विद्यालय, रुईछत्तीसी या विद्यालयातील सहा विद्यार्थी गुणवत्ता यादी झलकले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री रा.ह.दरे यांचे वतीने कै. भिवराबाई हरिभाऊ दरे यांचे स्मरणार्थ शिष्यवृत्ती दिली जाते विद्यालयातील इयत्ता सहावी ज्ञानवर्धिनी परीक्षेत कुमारी समीक्षा सोमनाथ जगदाळे जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला तसेच स्नेहल नवनाथ म्हस्के हिने आठवा क्रमांक मिळवला. इयत्ता सातवी ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत कु.अंजली प्रभाकर म्हस्के हिने जिल्ह्यात चौथा, ज्ञानेश्वरी दत्तात्रय वाबळे हिने पाचवा, कु.सृष्टी शरद मोकळे हिने नववा, कु.स्नेहल कमलेश साळुंखे हिने दहावा क्रमांक पटकावला असून हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षिका श्रीमती उगले के. आर.श्रीमती मानकर डी एम, श्रीम. भोस यु. डी.श्रीम. बेरड यु एम, श्री मुळे डी एन., श्री गोरे एल. आर.,श्रीमती गोरे एस आर पर्यवेक्षिका सौ पाडळकर टी एम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रा. ह.दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर सचिव विश्वासराव आठरे पाटील,सहसचिव जयंतराव वाघ खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे ज्येष्ठ विश्वस्त श्री जी. डी. खानदेशे,श्री नंदकुमार झावरे, श्री सिताराम खिलारी,श्री मुकेश दादा मुळे व सर्व संस्था पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य श्री दत्ता पाटील नारळे पर्यवेक्षिका सौ.तारा पाडळकर तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे