ब्रेकिंग
एम बी बी एस परीक्षेत आदित्य पाटील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0
3
9
0
2
5
- एम बी बी एस परीक्षेत आदित्य पाटील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर: तालुक्यातील टाकरखेडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर उत्तम पाटील यांचे नातू व शिवाजी हायस्कूल तांबेपूरा अमळनेर येथील पर्यवेक्षक एस. एम. पाटील यांचे चिरंजीव आदित्य सुधाकर पाटील याने एम. बी. बी.एस. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. मुंबई येथील द हिदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आर एन कपुर मेडिकल कॉलेज मधून त्यांने ही पदवी संपादन केली.
त्याच्या या यशाबद्ल त्याचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ, शाळेतील सहकारी व नातेवाईक मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.
0
3
9
0
2
5