Breaking
ब्रेकिंग

नगर सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, वाळुंज शिवारातील घटना. . .

0 3 9 0 2 7

नगर सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, वाळुंज शिवारातील घटना. . .

नारायणडोह (प्रतिनिधी) – नगर सोलापूर महामार्गावर वाळुंज (ता.नगर) गावच्या शिवारात मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.२५ मार्च) सकाळी घडली. परवेज बशीर शेख (वय ३३, रा. वाहिरा, ता.आष्टी, जि.बीड) असे मयताचे नाव आहे.

मयत परवेज शेख हा आपल्या दुचाकीवर नगर हून सोलापूरच्या दिशेने चाललेला होता. वाळुंज गावच्या शिवारात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत तो मालट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मयत झाला.

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत अपघाताला कारणीभूत ठरलेला मालट्रक व त्याचा चालक यांना ताब्यात घेतले. मयत परवेज शेख याच्या मृतदेहाचे दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

सहाय्यक फौजदार गुंजाळ यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे