हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका”*
*हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका”*
जिल्हा प्रतिनिधी :- पंंकज पाटील
जळगाव : शहरातील हॉकर्सना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या मनमानी कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता, पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील अनेक लघु व्यावसायिक व हॉकर्स आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करत असताना, महापालिका अतिक्रमण विभागाकडून होत असलेली कारवाई ही अन्यायकारक व भेदभावपूर्ण असल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक वेळा ही कारवाई इतक्या कठोर व असंवेदनशील पद्धतीने केली जाते की, ती पद्धत इंग्रजकालीन दडपशाहीची आठवण करून देणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, हॉकर्सच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका मांडल्यानंतर शहरातील अनेक हॉकर्स बांधवांनी मनसेशी थेट संपर्क साधत आपल्या व्यथा, अडचणी व अन्यायाच्या घटना मांडल्या आहेत. यामुळे या प्रश्नाची तीव्रता अधिक स्पष्ट झाली असून, या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत हॉकर्सच्या अडचणी, त्यांच्या उपजीविकेचे प्रश्न, कायदेशीर हक्क आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हॉकर्सच्या सन्मानाचा पूर्ण विचार करून महापालिकेसमोर एक ठोस व कृतिशील आराखडा (Action Plan) मांडणार आहे.
तरी जळगाव शहरातील सर्व हॉकर्स, लघु व्यावसायिक तसेच संबंधित नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्यांसह या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येत आहे.
हॉकर्सच्या हक्कासाठी व सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव कटिबद्ध असून, या बैठकीतून पुढील लढ्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.


