Breaking
ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत कामगिरी

0 8 6 5 0 8

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत कामगिरी

किमया तरवडे जिल्ह्यात प्रथम, राज्यात पाचवी; राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र

राहुरी तालुका जावेद शेख

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

इयत्ता आठवीतील कु. किमया निलेश तरवडे हिने २८४ गुण मिळवून अहमदनगर जिल्ह्यात प्रथम व राज्यात पाचवा क्रमांक पटकावला असून ती राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.

तसेच देवाशीष सुनील तोडमल (२२० गुण), प्रथमेश अरुण राहिंज (२१६ गुण), श्रुती संदीप सिरसिम (२१४ गुण) आणि महिमा बाबासाहेब हराळे (२१२ गुण) यांनी ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत अवधूत राजेंद्र भुजाडी याने २२६ गुण मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली.

यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीसाठी तुकाराम गोविंदराव जाधव, सविता ढोमसे व सविता गव्हाणे, तर इयत्ता आठवीसाठी गोकुळ ठाकूर, हलीम शेख, रविंद्र हरिश्चंद्रे व सचिन सिन्नरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपवहिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वर्षी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनीही असेच उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन केले. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन व सुविधा विद्यालयामार्फत उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सभापती डॉ. सातप्पा खरबडे तसेच सचिव डॉ. महानंद माने यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बाबा, प्रा. जितेंद्र मेटकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे