अमळनेर येथे महिला भगिनींनीसाठी योग शिबिर

अमळनेर येथे महिला भगिनींनीसाठी योग शिबिर
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरात दत्त ग्रुप महिला मंडळ यांच्या कडून योगा शिबिर छत्रपती शिवाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक , 6 मे पासून सुरू झालेले असून सकाळी 6 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे. ठिकाण दत्त मंदिर छत्रपती शिवाजीनगर, या ठिकाणी माता भगिनींनी लाभ घ्यावा ,शरीर संपत्ती हीच खरी मोठी संपत्ती असते.आजची जीवन शैली बदलत चाललेली आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान महिलांना होत आहे तरी यासाठी दत्त ग्रुप महिला मंडळ यांनी खूप चांगली संधी दिलेली आहे.यांचा सर्व महिला भगिनींनी लाभ घ्यावा.आरोग्य हिच धनसंपत्ती असते व आपण त्याकडे लक्ष न दिल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागते पण जर योगा करत असाल तर चिंता करण्याची गरज नाही.दत्त ग्रुप महिला मंडळ अशा प्रकारची उपक्रम राबवत असतात व समाजातील
इतर लोकांना प्रेरणा देण्याच काम करत असतात.दत्त ग्रुप महिला मंडळाच्या सामाजिक कार्यकर्ते मनिषा प्रताप शिंपी ज्योतीताई ,प्रकाश माळी ,सुषमाताई पारधी यांनी महिला भगिनींनीसाठी योग शिबिर आयोजीत केलेले आहे.