Breaking
ब्रेकिंग

भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

0 3 9 0 2 7

भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ भिगवन येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अ़ॅण्ड रिसर्च या महाविद्यालयाच्या वतीने भव्य स्वरूपात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. २० व २१ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. सदर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्व विद्यापीठ तसेच असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया व असोसएिशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल्स महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसेच भारतातील अनेक राज्यातील शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

परिषदेमध्ये “औषधनिर्माणशास्त्र संशोधनातील प्रगती: पारंपारिक ते नवीन दृष्टिकोन” या महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या अंतरीष्टीहय परिषदेमध्ये १५८८ विदयार्थी शिक्षक व नवसंशेधक यांनी सहभाग नोदविला. परिषदेच्या विविध सत्रांमध्ये शोधनिबंध सादरीकरण, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि तांत्रिक सत्रे घेण्यात आली. सहभागीनी विविश्व विषयांवर संशोधन सादर केले आणि आपले विचार मांडले.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेने उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले उ‌द्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. प्रभाकर रेड्डी (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया-सदस्य), डॉ. राकेश सोमाणी (अध्यक्ष असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया) तसेच श्री. लक्ष्मीकांत सदाफुले (व्यवस्थापकीय संचालक अ़ॅक्वाड्राय फार्मा प्रा. लि. सोलापूर) तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व सचिव सौ. माया झोळ तसेच सर्व पदाधिकारी, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. रामदास झोळ यांनी आपल्या भाषणाद्वारे सांगितले की ही अंतरराष्ट्रीय परिषेद संशोधन आणि नवसंशोधनाच्या विचारांना चालना देणारी ठरेल. ग्रामीण भागात ही अंतरराष्ट्रीय वक्ते बोलावून अशा अंतरराष्ट्रीय परिषदाचे आयोजन झाले तर नक्कीच ग्रामीण भागातील विदयार्थी ही संशोधनात अग्रेसर राहतील असा विश्वास प्रा. झोळ सर यांनी व्यक्त केला.

या अंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ओमन या देशातून डॉ. झोका अल-कुसाबी, डॉ. महमंद इसाक, डॉ. हौदर अल मुसावी तसेच भारतातील औषधनिर्माण शास्त्राच्या नामाकित सस्थेतील डॉ. सुरेश बाबु (सिनीअर शारवज्ञ – सीएसआयआर आयआयसीटी, हौदाबाद), डॉ एन शंकराई (नायपर हौदाबाद) या नामांकित संशोधक व्याख्यात्यांनी विदयार्थ्यांना “औषधनिर्माणशास्त्र संशोधनातील प्रगती पारंपारिक ते नवीन दृष्टिकोन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर व मौखिक सादरीकरण सत्रामध्ये १५० हून अधिक पोस्टर सादरीकरण व १८० हून अधिक मौखिक सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारच्या सांस्कृतिक कलात्मकतेचे सादरीकरण करण्यात आले.

डॉ. विशाल पांडे (कार्यकारी परिषद सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ) व डॉ. मृणाल सिरसट (अध्यक्ष, असोसीएशन ऑफ फॉर्मसी प्रोफेशनलस) व प्रा रामदास झोळ सर (संस्थापक आध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था) यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला. पोस्टर सादरीकरण प्रकारात प्रथम पारितोषिक डॉ. भानुबेन नानावती कॉलेज ऑफ फार्मसी, नवी मुंबई यांनी पटकाविले तर द्वितीय व तृतीय पारितोषिक विभागून गांधी नाथा रंगजी कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर, यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा, स्वेरिज कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपुर, दत्तफला इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अ़ॅण्ड रिसर्च, स्वामी चिंचोली, श्रीराम कॉलेज ऑफ फार्मसी, पानीव यांना देण्यात आले. ऑनलाईन मौखिक सादरीकरण प्रकारात श्रीनिवासा आर बुलीची (BITS Pilani) सागर डी मगर, (प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी प्रवरानगर डॉ. रामरेडडी गोडेला (हौद्राबाद) दिप्ती बोराडे (एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे) डॉ. श्री व सी. अरविदेकर (भारती विदयापीठ कोल्हापूर) तसेच मौखिक सादरीकरणात सोजर कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले तसेच द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी प्रवरानगर व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे यांनी पटकाविले.

सदर आतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विशाल बाबर, प्रा. ज्योती जावाळे, डॉ. के श्रीकात, डॉ. ढोबळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. यशस्वी आयोजनाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापन कौतुकास पात्र ठरले आहे.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे