Breaking
ब्रेकिंग

श्री. शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक पदी निवड

0 9 1 0 9 1

श्री. शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक पदी निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १९/ कै. नामदेवराव जगताप साहेबांचे नातू आणि माजी आमदार श्री. जयवंतराव जगताप साहेबांचे सुपुत्र श्री. शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (DCC Bank) सर्वात कमी वयाचे संचालक म्हणून निवड झाली आहे. तीन पिढ्यांचा वारसा आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा शिल्पकार असणारे जगताप परिवार, तसेच सहकाराची मुळे घट्ट रुजवून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारी परंपरा ही करमाळा तालुक्याला लाभलेली एक अनमोल देणगी आहे.

कै. देशभक्त नामदेवराव जगताप साहेब यांनी सहकार चळवळीचा पाया रचला, तर आदरणीय माजी आमदार श्री. जयवंतराव जगताप साहेब यांनी हा सहकाराचा वटवृक्ष जीवापाड जपला आणि वाढवला. जगताप परिवारावर तीन पिढ्यांपासून असलेले जनतेचे हे अतूट प्रेम म्हणजे त्यांच्या निस्वार्थ समाजकार्याची आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या समर्पणाचीच पावती आहे.

तसेच कै. नामदेवराव जगताप यांच्या उजनी धरणाचा ऐतिहासिक निर्णयामुळे करमाळ्याची हरितक्रांती झाली. सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या ‘यशवंत सागर’ (उजनी) धरणाच्या निर्मितीमागे कै. नामदेवराव जगताप साहेबांची दूरदृष्टी आणि प्रबळ इच्छाशक्ती उभी आहे. करमाळा तालुक्याला सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी धरणाची नियोजित जागा बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. उजनी धरणाच्या भूमिपूजन समारंभात यशवंतराव चव्हाण साहेबांनी काढलेले उद्गार आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत. ते म्हणाले होते, “हे पंढरीच्या विठ्ठला, मला माफ कर! करमाळ्याच्या नामदेवाच्या (नामदेवराव जगताप साहेब) सांगण्यावरून मी तुझ्या चंद्रभागेवरती बांध टाकत आहे.” या एका निर्णयामुळे आज करमाळा तालुक्यातील ५० हून अधिक गावे हरितक्रांतीखाली आली आहेत आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा सुजलाम – सुफलाम झाला आहे.

कै. नामदेवराव जगताप साहेबांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणण्याची ऐतिहासिक सोय केली, तर त्यांचे सुपुत्र आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC) माध्यमातून हे पाणी पाईपलाईनद्वारे थेट शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले. पाणी आणि अर्थसहाय्य यांच्या या सांगडीमुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. आजही लाखो शेतकऱ्यांचे अंतःकरणपूर्वक आशीर्वाद जगताप कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

शंभूराजे जयवंतराव जगताप त्यांच्या रूपाने आज नव्या पिढीचा दमदार शुभारंभ झाला आहे. सहकाराची गौरवशाली परंपरा तिसऱ्या पिढीच्या हाती सोपवली जात आहे. आज शंभूराजे जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाली, या ऐतिहासिक निवडीचे स्वागत करण्यासाठी करमाळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच मोठी गर्दी केली होती. शंभूराजे यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात आले. जनतेचे इतके निस्वार्थ प्रेम आणि विश्वास संपादन करण्यासाठी खरोखरच पुण्यवान आणि भाग्यवान असावे लागते. तीन पिढ्यांचा हा जनसेवेचा वसा शंभूराजे तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने पुढे नेतील, असा दृढ विश्वास संपूर्ण तालुक्याला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 0 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे