माळीवाडा परिसरात पत्रकारावर हल्ला ; दोघांविरुध्द कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल
माळीवाडा परिसरात पत्रकारावर हल्ला ; दोघांविरुध्द कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल
नगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के
नगर शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुन्हेगारांना पोलिसांनी खाकीचा धाक दाखवणं गरजेचं आहे.माळीवाडा परिसरात एका मोबाईल शाॅपवर रिचार्ज करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी एका पत्रकारला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना रविवार दि .२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी माळीवाडा परिसरात घडली. इतकेच नव्हे तर, एकाने हातातील टणक वस्तूने गालावर, व डोक्यावर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.सदर मारहानीचे सिसिटीव्ही कॅमेरेत चित्रीकरण कैद झाले आहे.
रफिक गुलाब शेख (वय ३१, रा. नारायणडोह, ता. अहिल्यानगर) असे जखमीचे नाव असून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पप्पु साठे, बाबा नवगिरे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. माळीवाडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रफिक शेख यांचा भाऊ जावेद शेख यांचे माळीवाडा येथील जिल्हा परिषदेजवळ मोबाईल शॉपीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रफिक दुकानात असताना, पप्पू साठे व बाबा नवगिरे तेथे आले. त्यांनी रफिक शेख यांना मोबाईल रिचार्ज करण्यास सांगितले. भाऊ जावेद बाहेर गेला आहे, तो आल्यावर रिचार्ज करेल तुम्ही नंतर या, असे रफिक यांनी सांगितल्याचा संशयित आरोपींना राग आला. त्यांनी रफिक यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी मिळून रफिक यांना मारहाण केली. नवगिरे याने त्याच्या हातातील टणक वस्तूने रफिक शेख यांच्या गालावर व डोक्यावर मारून जखमी केले. जीवे मारून टाकण्याची धमकी देत संशयित आरोपींनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर रफिक शेख यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत.


