Breaking
ब्रेकिंग

दक्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने ‘ सन्मान कर्तृत्वाचा ‘ कार्यक्रम संपन्न

पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शासकिय अधिकारी यांचा सत्कार व सन्मान संपन्न

0 3 9 0 2 7

दक्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने ‘ सन्मान कर्तृत्वाचा ‘ कार्यक्रम संपन्न

पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शासकिय अधिकारी यांचा सत्कार व सन्मान संपन्न

दक्ष पोलीस मित्र संघटनेचा उल्लेखनीय उपक्रम

एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा

अहिल्यानगर : दक्ष पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्या केल्याबद्दल शुक्रवार दि . २४ जानेवारी २०२५ रोजी नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या अहिल्यानगर येथील शेतकरी भवन सभागृहात दुपारी १ वाजता सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत हर्ष उल्हासात पार पडला .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरचे प्रांत अधिकारी सुधीर पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार संजय शिंदे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल योगेश गुंड(दै लोकमत) शशिकांत पवार (दै.पुढारी) संजय वायकर ( एस डब्ल्यु न्यूज व दै . पराक्रमी ) शिवहरी म्हस्के (दै.पराक्रमी) रफीक शेख(दै.प्रभात)द.युवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अन्सार शेख, बाळासाहेब गदादे, (दै.पुण्यनगरी) हेमंत साठे (दै.जलभूमी)शिवाजी लगड, संजय ठोंबरे (लोकमत समाचार),शाम कांबळे (सत्यजित महाराष्ट्र), युनास पठाण, पल्लवी चांदगुडे, अनिकेत, आफताब शेख (न्युडटुडे) सबिल सय्यद(युथ२४),अनिकेत गवळी, महिला पत्रकार रोहिणी पवार ( नगर शहर पत्रकार ) आर्दश संपादक पुरस्कार उपसंपादक सुनिल चोभे (नगर सह्याद्री) संपादक जयंत कुलकर्णी (दै.प्रभात) संपादक गजेंद्र राशिनकर, (दै.पराक्रमी) सामाजिक कार्यकर्ते परसराम जगधने, अरीफ पठाण, शिवाजी कावरे,रामदास फणसे, आर्दश ग्रामसेवक बाबासाहेब रामदास फणसे, आदर्श उपसरपंच बाबासाहेब काळे, आर्दश डॉक्टर रोहित करांडे, आर्दश प्राचार्य विजय कुमार पोकळे, कैलास बहिर उत्कृष्ट तलाठी, उत्कृष्ट अधिक्षक प्रकाश धोंडे, स्वप्नील सोनार, विविध उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी नगर सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रशासनाच्या कामानिमित्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, यांचा नेहमी संबंध येत असतात परंतु आज या पुरस्कारा एक प्रगतिशील शेतकरीर्याला देखील पुरस्कार दिला जात आहे. हि गोष्ट अभिमानास्पद आहे एकरी एकशे वीस टनांचे उसाचे उत्पन्न घेऊन विक्रम नोंदवला हे ऐकून आपण खरंच आपण कृषी प्रधान देशात आहोत हे वाटते .या शेतकरी बांधवास पुरस्कार मिळत आहे खुप समाधानाची बाब आहे. तसेच तहसीलदार शिंदे यांनी आपल्या मनोगतात दक्ष पोलीस मित्र संघटना कार्य हे शासनास मदतीच्या काळात संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करत आहे हे अभिमानास्पद आहे. या वेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दक्ष पोलीस मित्र संघटनेचे काम अहिल्यानगर जिल्हात उल्लेखनीय कामगिरी आहे ते वाखण्याजोगे आहे.

या कार्यक्रमासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,तहसीलदार संजय शिंदे, दक्ष पोलीस संघटना अध्यक्ष शहादेव मुंगसे,जयंत कुलकर्णी, सुनील चोभे, विजयकुमार पोकळे, प्रकाश धोंन्डे,रामचंद्र कदम, पोपट बनसोडे,अर्चना पडवळ, शिवाजी कावरे, वंदना निमसे, तात्यासाहेब सांबळे, दादू गायकवाड, आदि मान्यवर उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे