करमाळा येथील श्रीकमलादेवी मंदिराचे दर्शन भक्तांना लवकरच होणार ; मंदिराचा जीर्णोद्धार प्रगती पथावर . . .
देवीभक्तांचा मदतीचा ओघ सुरूच . . .
करमाळा येथील श्रीकमलादेवी मंदिराचे दर्शन भक्तांना लवकरच होणार ; मंदिराचा जीर्णोद्धार प्रगती पथावर . . .
देवीभक्तांचा मदतीचा ओघ सुरूच . . .
प्रतिनिधी : दुर्गेश राठोड
करमाळा : श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकांमार्फत श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
शनिवार दि .८.०२.२०२५ रोजी रोख देणगीरु.१०,००१/- ( रूपये दहा हजार एक ) श्री. संतोष सुभाष राठोड रा. करमाळा यांच्याकडून प्राप्त झालीआहे. यानिमित्त यांचा सत्कार मंदिर समितीचे विश्वस्त श्री सुशील राठोड,व्यवस्थापक अशोक गाठे, पद्माकर सूर्यपुजारी,यांनी सत्कार केला . या प्रसंगी राठोड परिवार तसेच भक्तगण उपस्थित होते .
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे .
ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे .
संपर्क : अशोक गाठे व्यवस्थापक .
मो .नं .९४०४७०८९२४