राहुरी तालुक्यातील कानडगांव पंचक्रोशीचे आराध्य दैवत शेरखावली बाबा यात्रा उत्सव. .
राहुरी तालुक्यातील कानडगांव पंचक्रोशीचे आराध्य दैवत शेरखावली बाबा यात्रा उत्सव. .
राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख
सालाबाद प्रमाणे भरणारी यात्रा याही वर्षी 11 ते 13 जानेवारी या कालावधीत भव्य यात्रा उत्सव साजरा होत आहे.
राहुरी तालुक्यातील सर्वात जुनी व ग्रामीण भागातील यात्रा म्हणून कानडगांवची यात्रा प्रसिद्ध आहे. शेरखावली बाबांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून परजिल्ह्यातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात तसेच अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर बाबांच्या नवसस्फूर्ती करतात यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त कार्यक्रम दिनांक 11 जानेवारी रोजी भव्य असा संदल चा कार्यक्रम होणार आहे, शेरखावली बाबा ट्रस्ट यांच्या वतीने गावातून संदलची मिरवणूक काढली जाते.
12 तारखेला कानडगांव ग्रामस्थांच्या व यात्रा कमिटीच्या वतीने छबीना मिरवणूक व भव्य शोभेंच्या दारूची आतीशबाजी होते.13 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम व दुपारी तीन वाजता नामांकित पैलवानाच्या जंगी हगाम्यांचा कार्यक्रम होणार आहे शेरखावली बाबा हे पंचक्रोशीचे आराध्य दैवत असून जागृत देवस्थान असल्याने राज्यभरातील भाविक दर्शनाचा लाभ घेतात यात्रे मध्ये परिसरातील सर्व माहेरवाशींनी व भाविक येऊन खरेदीचा आनंद घेतात. गर्दी खूप असते , ट्रस्ट कडून व यात्रा कमिटीकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो.भाविक आपल्या मनोकामना पूर्ण होतात.