ब्रेकिंग
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेकडून यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार जी. एस. हायस्कूल येथे संपन्न*

0
4
3
4
9
3
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेकडून यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार जी. एस. हायस्कूल येथे संपन्न*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- आज दि 29 -06-2025 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून 10 वी व 12 येथील गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमात प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य. ए. बी. जैन यांनी प्रमुख उपस्थिती दिली.
यावेळी मंचावर प्राचार्य ए. बी जैन सर, प्राध्यापक किरण सनेर सर, प्रदेश कार्य समिती सदस्य भाविन पाटिल, अभिनंदन जैन, नवनिर्वाचित शहरमंत्री प्रियंका सैंदाणे उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य ए. बी. जैन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाविन पाटिल यांनी अभाविप परिचय मांडला.
यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने अभिनंदन जैन यांनी केला.
0
4
3
4
9
3