Breaking
ब्रेकिंग

मुळाडॅम फाट्यावर नगर -मनमाड रोडवर रोडलाईन क्रोससिंग मुळे पडला मोठा खड्डा.

अपघातानंतर खड्डा बुजविण्यात येणार का सर्व सामान्य नागरिकाची ची चर्चा

0 7 6 9 4 2

मुळाडॅम फाट्यावर नगर -मनमाड रोडवर रोडलाईन क्रोससिंग मुळे पडला मोठा खड्डा.

अपघातानंतर खड्डा बुजविण्यात येणार का सर्व सामान्य नागरिकाची ची चर्चा.

राहुरी / विशेष प्रतिनिधी :  जावेद शेख

मुळाधरणातुन रस्ताच्या बाजुने वांबोरी लाईन व मिरी तिसगाव योजनेची पाईप लाईन चे गेल्या दोन-तीन महिने पूर्वी काम करण्यात आले परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे .

मुळा-डॅम फाटा ते मुळाधरण 8 कि मी रस्ते चे गेल्या 1 वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून रस्तेचे काम करण्यात आले परंतु रस्त्यावर जे.सी.पी.व क्रेन मुळे डांबरीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

मुळाडॅम फाट्यावर नगर -मनमाड रोडवर रोडलाईन क्रोससिंग करून वांबोरी लाईन व मिरी तिसगाव योजनेच्या दोन्ही लाईन एकत्र टाकण्यात आले परंतु नगर -मनमाड रोडवर रोडलाईन क्रोससिंग मुळे डांबरीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मोठा खड्डा व रस्ता खचला असुन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

वांबोरी व मिरी तिसगाव योजनेची पाईप लाईन मुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती रस्त्याच्या कडेला टाकून रस्त्यावर ये जा करणा-या वाहन चालवताना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे सध्या पावसाळा सुरू असुन पावसाच्या पाण्यामुळे चिखल होवुन अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करून निघून जातात व उडवाउडवीची उत्तरे दिली जातात तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी त्यासंबंधी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे