Breaking
ब्रेकिंग

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*

आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व अनन्य साधारण*- अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे*

0 4 3 3 2 2

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*

*आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व अनन्य साधारण*- अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे*

राहुरी तालुका जावेद शेख

शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा अंगीकार केल्यास त्यांचे शारिरीक व मानसीक आरोग्य उत्तम राहुन त्यांची एकाग्रता वाढते त्यामुळे अभ्यासामध्ये प्रगती होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पदुत्तर महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. साताप्पा खरबडे मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भनगे , आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले, सावित्रिबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण तुपविहीरे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब खेत्री व इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापीका श्रीमती योगीता आठरे उपस्थित होते.
योगशिक्षक डॉ. बी. डी. पाटील व श्री. रविंद्र आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सुंदरम घुले, विद्यार्थिनी कु.स्नेहा तांबे, कु. प्रज्ञा आंधळे व कु. शिवानी शिंदे यांनी उत्तम प्रकारे योग व प्राणायाम प्रात्यक्षिके करुन घेतले. डॉ. सुनील भनगे यांनी स्वागत तर क्रीडा शिक्षक श्री.घनश्याम सानप यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री. बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक श्री. मनोज बावा, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सावित्रिबाई फुले प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे