दोन मुलींनी मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे नेणाऱ्या वृद्धेचे ३५ हजार लांबवले

दोन मुलींनी मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे नेणाऱ्या वृद्धेचे ३५ हजार लांबवले
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे नेणाऱ्या वृद्धेच्या पिशवीला कटर मारून रिक्षामधून ३५ हजार रुपये दोन अज्ञात मुलींनी चोरून नेल्याची घटना १८ रोजी १ वाजून ५० मिनिटांनी श्री ऍक्सीडंट हॉस्पिटल समोर घडली.कल्पनाबाई भिमराव संदानशीव वय ६० ही मुलाच्या पायाच्या ऑपरेशनसाठी बडोदा बँकेत ३५ हजार रुपये काढण्यासाठी आपल्या नातूसोबत गेली. पैसे काढल्यानन्तर ती श्री ऍक्सिडंट हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली. कल्पनाबाई आपल्या नातूसोबत रिक्षामध्ये बसताच दोन मुली पण येऊन बसल्या. हॉस्पिटल जवळ रिक्षा थांबली तेव्हा रिक्षावाल्याला पैसे द्यायला पिशवी उघडली तेव्हा तिला पिशवी कापलेली दिसली. लागलीच मुली आणि रिक्षावाल्याने पळ काढला. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.