Breaking
ब्रेकिंग

राहुरी विधानसभेत अक्षय कर्डिलेंचा दिमाखदार विजय

विरोधकांची केली अक्षरशः चाळण ; विरोधकांचा सुपडा साफ

0 7 9 8 0 4

ही निवडणूक नव्हतीच, मतदाराने स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रति असलेली भावना मतातून व्यक्त केली – अक्षय कर्डिले

राहुरी विधानसभेत अक्षय कर्डिलेंचा दिमाखदार विजय

विरोधकांची केली अक्षरशः चाळण ; विरोधकांचा सुपडा साफ

१,११,८२६ मतांनी विजयी

प्रतिनिधी : संजय वायकर

राहुरी : ४ मे / राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उर्मेदवार अक्षय कर्डिले एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली आहेत. भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने स्व. शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे.

२४ व्या फेरी अखेर मिळालेली मते अक्षय कर्डिले (भाजपा) – १,३९,२१२ गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी शरद पवार) – २७,३८६ संतोष चोळके (वंचित) – ५,६६३ रावसाहेब खेवरे (अपक्ष) – ७,२३४ (अक्षय कर्डिले – एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी)

पहिल्या फेरीत अक्षय कर्डिले यांना ४,९८८ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांना केवळ ७२२ मते मिळाली. पहिल्या फेरीअखेर कर्डिले यांना ४,२६६ मतांची आघाडी मिळाली. कर्डिले यांना पहिल्या फेरीपासून मिळालेली आघाडी सोळाव्या फेरीअखेर कायम राहिली. अखेर २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळवत विजयी झाले.

निकालाच्या काही वेळ आधी कर्डिले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की,”जनतेने दाखवलेला विश्वास आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू. ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती. ही निवडणूक नव्हतीच तर प्रत्येक मतदाराने आपली स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रति असलेली भावना मतातून व्यक्त केली आहे. गेली ३० वर्षे कर्डिले यांनी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते, स्थान मिळवले होते. आज ते आपल्यासमवेत नाहीत. परंतु तेवढेच प्रेम, विश्वास जनतेने माझ्याबद्दल दाखवून मला संधी दिली आहे. आगामी काळात जनतेने दिलेली संधीचा उपयोग आपणही प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू” असे अक्षय कर्डिले यांनी सांगितले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे