Breaking
ब्रेकिंग

राहुरी शहर व तालुक्यात प्लास्टिक बंदी कायदची कठोर अंमलबजावणी करावी.

0 8 6 5 0 8

राहुरी शहर व तालुक्यात प्लास्टिक बंदी कायदची कठोर अंमलबजावणी करावी.

राहुरी तालुका जावेद शेख

निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या वतीने राहुरी शहर आणि तालुक्यात प्लास्टिक बंदी कायदची कठोर अंमलबजावणी करावी असे निवेदन राहुरीचे तहसीलदार अमित पवार, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हराळ यांना देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नाॅन – बायोडिग्रेडेबल गार्बेज अॅक्ट 2006 च्या कलम 4(1) व 4(2) अंतर्गत प्लास्टिक व थर्माकोल विक्री, साठवून व वापरावर निर्बंध घातले आहेत. दुकानदारांकडून सहज उपलब्ध होत असल्याने ग्राहक सर्रास वापर करतात. दुकानदारांकडून उपलब्ध न झाल्यास नागरिक पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करतील.म्हणून प्लास्टिक बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असे आवाहन निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांनी केले. याप्रसंगी राज्य संघटक गणेश शिंदे, कायदेशीर सल्लागार अॅड. शर्मिष्ठा डोंगरे, पर्यावरण प्रेमी साहेबराव गाडे, अनिल विधाते, गोरक्षनाथ नवले, साहेबराव बोरूडे, सुरेश गव्हाणे इत्यादी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे