Breaking
ब्रेकिंग

काँग्रेस कमिटीने तहसील आवारात चुलीवर चहा बनवून गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करत आंदोलन

0 8 6 5 1 4

काँग्रेस कमिटीने तहसील आवारात चुलीवर चहा बनवून गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करत आंदोलन

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी शुक्रवारी, सकाळी ११.०० वाजता, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने, अमळनेर तहसील आवारात, तीन विटांच्या चुलीवर, गुळाच्या चहा बनवून, गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. व गॅसच्या किमती पूर्ववत करण्यासाठी, मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन दिले.

निवेदनात काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, युद्धजन्य
         परिस्थितीत लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेत, भाजपा सरकारने  गॅस दरवाढीचा घाट घातला. राज्यात पहिल्यानेच महागाई भडकलेली असताना, केंद्र सरकारने अचानक घरगुती वापराच्या व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत.
       आतापर्यंत मोदी सरकारने त्यांच्या कार्य काळात, ५० वेळा गॅस सिलिंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत. जेव्हा जगाच्या पाठीवर बॅरलच्या (कृड ऑइल) किमती कमी झाल्या होत्या, त्यावेळी गॅसच्या किमती कमी करणे आवश्यक होते. परंतु त्यावेळी भाजप सरकारने  गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या नाहीत. आणि आता युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन अचानक  गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या. हा नफेखोरीचा धंदा आहे.हे जनतेच्या भल्याचं धोरण नाही.त्यात आज घरगुती (डोमेस्टिक) गॅस सिलेंडर रुपये 720  वरून 860 रुपयावर करून, प्रति सिलेंडर रुपये 60 ची दरवाढ केलेली आहे. तर कमर्शियल गॅस सिलेंडर रुपये 1810 वरून 1924 म्हणजे, रुपये 114 ची प्रति सिलेंडर दरवाढ केलेली आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा नोंदणी कालावधी ग्रामीण भागात४५ दिवसाचा तर शहरी भागात 25 दिवसाचा  केलेला आहे, हा निव्वळ जनतेचा विश्वासघात आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे अंदाजपत्रक बिघडलेले आहे.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात 400 रुपयांना गॅस सिलेंडर मिळत होत. त्याची किंमत आज भाजपा सरकारच्या काळात जवळपास ९०० रुपये झालेली आहे. आधीच गॅस सिलेंडरच्या किमती जास्त असताना अचानक दरवाढ झाल्याने,*हेच का भाजप सरकारचे अच्छे दिन*? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. या किंमत वाढीचा फटका महिला, सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे.
म्हणून या  निवेदनाद्वारे अंमळनेर तालुका काँग्रेस कमीटी ची मागणी आहे की, *गॅस सिलेंडरच्या वाढीव किमती त्वरित कमी कराव्यात व जनतेला  पूर्ववत भावात सिलेंडर पुरवठा करावा*आंदोलनात व निवेदन देताना बरीच मंडळी उपस्थित होती. त्यात काँग्रेस तालुका अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी, लोटन अण्णा चौधरी, सुलोचना वाघ, मगन वामन पाटील, मनोज पाटील, संदीप घोरपडे, गजेंद्र साळुंखे,  एड. तीलो तमा पाटील, कैलास प्रल्हाद पाटील, एड.क्रांती ठाकरे, एड. चारू शिंदे, के व्ही पाटील, डी झेड महाजन, पार्थराज पाटील, बन्सीलाल भागवत, ए डी पाटील, भगवान संधान शिव, तोसीब तेली, डॉ. रवींद्र पाटील, अनिल पाटील, नगराज पाटील, रामकृष्ण नामदेव पाटील, एस सी तेले, रोहिदास कापडे, दिलीप साहेबराव पाटील, राजेंद्र पौला चौधरी, डॉ. प्रकाश सोनवणे, पी वाय पाटील, राजू भाट, पितांबर पाटील, भिकाजी पाटील, मनोहर पाटील, मधुकर पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे