Breaking
ब्रेकिंग

लोअर तापी प्रकल्प’ला PMKSY-AIBP अंतर्गत जलशक्ती मंत्रालयात दाखल – – खासदार स्मिताताई वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

0 7 6 9 4 3

लोअर तापी प्रकल्प’ला PMKSY-AIBP अंतर्गत जलशक्ती मंत्रालयात दाखल – – खासदार स्मिताताई वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

नवी दिल्ली – जळगांव धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पाण्याच्या गरजा लक्षात घेता, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – त्वरीत सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत ‘लोअर तापी प्रकल्प (Lower Tapi Project)’ याचा समावेश करण्याच्या प्रस्ताव आता जलशक्ती मंत्रालय कडे पाठविण्यात आला आहे.
         दिनांक १२ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली येथे सचिव (व्यय) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (Public Investment Board – PIB) महत्वाच्या बैठकीत या प्रकल्पाचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचे इतिवृत्त पुढील कार्यवाहीसाठी जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे.
        या महत्वपूर्ण टप्प्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय श्रीमती स्मिताताई वाघ यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की:
           > “लोअर तापी सिंचन प्रकल्पाच्या समावेशामुळे खान्देश परिसरातील हजारो एकर शेतीला पाण्याची शाश्वती मिळणार आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होईल. मी केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मन:पूर्वक आभार मानते.”
त्यांनी यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे