राष्ट्रीय परिवहन महामंडळ नागपूरच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा
राष्ट्रीय परिवहन महामंडळ नागपूरच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय परिवहन महामंडळ नागपूर येथील श्रीमती प्रमिला ताराचंद बोकडे या सेवानिवृत्त कर्मचारी असुन त्यांनी वरिष्ठ लिपिक म्हणून कार्य केलेले आहे . निवृत्तीनंतर कामगार वेतनवाढ 2020-24 नुसार त्यांना मिळणारी रक्कम जमा न करता कापण्यात आली असुन वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना सदर रक्कम मिळत नसल्याने प्रमिला बोकडे यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे . महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेमार्फत अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही . अपुऱ्या पैशाअभावी आजारपणामुळे त्यांना मानसिक नैराश्य आले असून बोकडे यांनी कंटाळून संबंधीत विभागाला पत्राद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे .
सदर निवेदनात म्हटले आहे की , मला प्राप्त झालेली रक्कम मला न कळविता कापण्यात आली आहे. ती का कापण्यात आली ही सुद्धा विचारणा केली होती. मला कुठलेही त्यावर उत्तर मिळाले नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या वतीने ही आपणास पत्र देण्यात आले असून त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. लेखा शाखेकडून कळविण्यात आलेली सन 2020-2024 च्या फरकाच्या देयकाची रक्कम राखुन ठेवण्यात आलेली आहे ,परंतु माझे यावर कोणतेही समाधान झालेले नाही. तसेच दि. 25/03/2026 रोजी दिलेल्या पत्रानुसार सुद्धा आपणास कळविण्यात आलेले असून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी आपणास कळविण्यात येते की, मी एक सेवानीवृत्त कर्मचारी असून तुटपुंज्या पेन्शनवर जगत असून मला मिळणारी हक्काची रक्कम जर आपणाकडेच राखुन ठेवण्यात येईल तर माझ्यावर उपासमारीची वेळ येणार नाही का ? आज वयोमानानुसार माझी प्रकृती साथ देत नाही अशावेळी प्रकृती स्वास्थ्याकरिता मला पैशाची नितांत गरज आहे. आता माझी मानसिक स्थिती अस्थिर झालेली असून आतासुद्धा हा माझ्यावर होणारा अन्याय आहे.
आपणास विनंती करण्यात येते की, माझे राखुन ठेवण्यात आलेली रक्कम तातडीने माझ्या खात्यात 15 दिवसांच्या आत टाकण्यात यावी व तसे कळविण्यात यावे अन्यथा मी विभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याचा गांभीर्याने विचार करावा असा विनंती वजा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . संबंधीत प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . संबंधीत प्रशासनाच्या निष्काळजी ढिसाळ कारभाराची चर्चा नागरिकांत होताना दिसते आहे .
सदर निवेदनपत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उप मुख्यमंत्री,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मध्यवर्ती कार्यालय, मा.महाव्यवस्थापक (क.व.औ.स.) मध्यवर्ती कार्यालय ,मा.मुख्य लेखा अधिकारी मध्यवर्ती कार्यालय, मा. मुख्य कामगार अधिकारी मध्यवर्ती कार्यालय, नागपूर येथील विभा. लेखा अधिकारी रा.प. नागपुर, वरीष्ठ व सुरक्षा दक्षता अधिकारी, विभाग नियंत्रक, मा. कामगार अधिकारी,वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेशपेठ नागपुर, मुख्य महीला आयोग अध्यक्षा, सरचीटनीस श्रीरंग बरगे साहेब महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस यांनाही पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे श्रीमती प्रमिला बोकडे यांनी सांगितले .


