एकलव्य क्रिडा मैदानाचा खेळाडु डॉ. सचिन रोंदिया IISC पुरस्काराने सन्मानित

एकलव्य क्रिडा मैदानाचा खेळाडु डॉ. सचिन रोंदिया IISC पुरस्काराने सन्मानित
अहिल्यानगर : एकलव्यचा खेळाडू, प्रख्यात शास्त्रज्ञ, संशोधक आणि भारतातील क्रमांक १ च्या संस्थेत, म्हणजेच भारतीय विज्ञान संस्थेत (Indian Institute of Science – IISc), बंगळुरू येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ डॉ. सचिन राजेश रोंदिया यांना यावर्षी प्रतिष्ठेचा IISC Award for Excellence in Teaching – 2026 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौक येथे डॉ . सचिन रोंदिया राहतात . या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण अहिल्यानगरचा गौरव वाढला आहे. विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे यश अहिल्यानगरसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
डॉ. सचिन राजेश रोंदिया आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !



