भिमाई आश्रमशाळेत महामानवाला महापरिनिर्वाणदिनी अभिवादन
भिमाई आश्रमशाळेत महामानवाला महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
इंदापूर / विशेष प्रतिनिधी
इंदापूर :(दि.६)- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्चमाध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.यावेळी तथागत गौतम बुद्धमूर्तीस,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांना वसतिगृह कर्मचारी जगदीश कांबळे यांच्या हस्ते पुष्प/ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी भाषणातून व गीतांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे तसेच अधीक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.