श्रीराम देवस्थान दहिगाव परिसरात वृक्षारोपण
*श्रीराम देवस्थान दहिगाव परिसरात वृक्षारोपण
प्रतिनिधी : शिवा म्हस्के
अहिल्यानगर : – नगर तालुक्यातील नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगतचे दहिगाव येथील ऐतिहासिक ईनाम वर्ग तिनचे श्री राम मंदिर देवस्थान आहे. देवस्थान मालकीचे साडे पाच एकर परिसर आहे. या परिसरात भव्य असे श्री राम देवस्थान आहे.या देवस्थान श्री राम मंगल कार्यालय आहे.या ठिकाणी मोठा मोकळा परिसर या ठिकाणी नगर शहरातील
स्वंयमप्रभा संघटनेच्या या महिला पदाधिकारी परीश्रमाने विविध वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी स्वंयमप्रभा संघटनेच्या स्नेहल धर्माधिकारी, अश्विनी धर्माधिकारी,अनुराधा पुराणिक,भक्ती पुराणिक,स्वाती वाळुंजकर,सह ३५ महिला सदस्य उपस्थित होत्या.या आधी या संघटनेच्या माध्यमातून आगडगाव,नेप्ती दादेगाव या वेळी श्री राम देवस्थान परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक उपक्रम संघटना राबवत आहे.या साठी वनविभागाच्या नर्सरी माध्यमातून रोप पुरवठा करणारे तुबिर लाड,रणसिंग यांचें सहकार्य लाभले,या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी श्री राम मंदिर देवस्थानच्या पदाधिकारीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्माना करण्यात आला. या वेळी महिला संघटना कार्य कौतुकास्पद कार्य आहे.असे मत जेष्ठ ट्रस्टी गायकवाड यांनी मांडले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच श्रीराम देवस्थानचे वंशपरंपरा विश्वस्त अनंत द्रविड यांनी असे सामाजिक उपक्रम साठी देवस्थान नेहमी सहकार्य करेल
या वृक्षारोपणना प्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर, अँड पोपट म्हस्के,ट्रस्ट सरचिटणीस नाना गायकवाड, उपअध्यक्ष मोहन निमसे,शरद कालेॅ, लक्ष्मण ढेरे ,शंकर पोटरे, संभाजी म्हस्के, सुभाष गांधी, जालिंदर म्हस्के, मोहम्मद सय्यद,रविराज पोटरे, तुकाराम हिंगे, आदि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.


