Breaking
ब्रेकिंग

नगर सोलापूर रस्त्यावर भरदुपारी मायलेकीचे अपहरण

फिल्मी स्टाईलने थरार... संर्तक तरुण व तत्पर पोलिसा मुळें दोन जीव वाचवण्यात यश...

0 7 6 9 4 1

नगर सोलापूर रस्त्यावर भरदुपारी मायलेकीचे अपहरण

फिल्मी स्टाईलने थरार…
संर्तक तरुण व तत्पर पोलिसा मुळें दोन जीव वाचवण्यात यश…

 विशेष प्रतिनिधी / शिवा म्हस्के 

 नगर सोलापूर हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने गाड्यांचा वेग खूप वाढला आहे.यात अनुचित घटना वाढ झाली आहे. या ठिकाणी पोलिस चौकी उभारणं गरजेचे आहे. आज भरदुपारी नगर सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी येथील लष्करी गेट क्रमांक ६ जवळ दुपारी दिड वाजता एम एच १६ डी एफ ३७५० या क्रमांक दुचाकीला चारचाकी वाहन अडवी मारून माय लेकीचे अपहरण करण्यात आले. तुकड्डओढा येथील जागृत तरूणांच्या सतर्क मुळे दोन जीव वाचवण्यात आले. सदर हकीगत नुसार अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध काॅलेज मध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी पेपर निमित्ताने रुईछत्तीसी येे जात असताना असताना पाळतीवर असलेले अपहरणकर्ते सुनसान जागा दिसताच चारचाकी(बलेनो वाहनातून) वाहनातून आलेल्या अपहरणकर्ते वाहन आढवे लावुन (मारुती सुझुकीची बलेनो )या गाडीत बळजबरीने घातले सोलापूर दिशेने वाहन वेगाने निघून जात असताना तुकडओढा येथील तरुणांनी सदर वाहन अडवण्यासाठी प्रयत्न केला पण वाहनाला वेग खूप होता रस्त्यावरील जागृत चालकांनी सदर अपहरण घटना पाहत बचाव कार्य साठी अटोकाट प्रयत्न केले. पण अपहरणकर्ते जोश मध्ये असल्याने सदर वाहन घटनास्थळीवरुन फिल्मी स्टाईलने माय लेकी अपहरण केले. सदर वाहन वेगाने जात असताना चार किलोमीटर अपहरण केलेल्या वाहनाचा दरवाजा उघडाच होता. स्थानिक तरुणांना पाठलाग केला परंतु वाहन खुप वेगानी निघून गेले घटनास्थळी तरुणांनी दरेवाडी सरपंच फोन करून माहिती दिली तसेच पोलिस आपत्कालीन सेवेला फोन करून अपहरण घटना कळवली दुसऱ्या तरुणांनी तो पर्यंत वाळुंज येथील तरुणांना हकीगत व वाहनांचे वर्णन सांगितले तरुणांना रस्तावर पाहताच चालकांने सदर वाहन वाळुंज बायपास दिशेने वळवली व वाहन वेगाने निघून गेल्याचे घटना स्थळी सांगितले.तो पर्यंत भिंगार कॅम्प पोलिस पथक घटनास्थळी तात्काळ दखल झाले होते. घटना स्थळी मोबाईल पर्स आयडी कार्ड , हाॅल तिकिट दुचाकी वरून नाव पत्ता वरुन नवनागापुर येथील सरपंच, पत्रकार यांना संपर्क साधुन सदर आयडी व्यक्ती तिथे राहतात खातरजमा केली व तो पर्यंत काही तरुण वाहनांचा पाठलाग करत होते. सदर वाहन पुण्याच्या दिशेने जात आहे.सदर पोलिसांनी कल्पना दिली तो पर्यंत पोलीसांनी चास कामरगाव सुपा परिसरातील तरुणांना संपर्क करून सदर वर्णनाचे वाहन अडवण्यासाठी सांगितले सदर वाहन दिसताच सुपा या ठिकाणी अडवण्यात आले वाहनासह अपहरणकर्ते ताब्यात घेण्यात आले.
सदर अपहरणकर्ते सदर घटना हकीगत विचारण्यात आले तर सत्य परिस्थिती समोर आली सदर पती पत्नी असल्याचे समोर आले पतीला पत्नी घटस्फोट देत नसल्याने मला दुसऱ्या प्रेयसी दुसरे लग्न करता येत नाही. त्यांमुळे कायमची सुटका करून घेण्यासाठी अपहरण केल्याचे समजते.पत्नी घटस्फोट देईल पण माझा व मुलीच्या भविष्यात साठी प पोटगी दिल्याशिवाय घटस्फोट देणार नाही. पोटगी देण्यासाठी पत्नी टाळत आहे.पोटगी टाळण्यासाठी कायमचा काटा काढण्यासाठी षंडयंत्र रचले संशय आहे. सदर पत्नीने या आधी आपल्या पती विरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशन गुन्हा दाखल केल्याचे प्राथमिक माहिती आहे. पोलिसांची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही प्रेस नोट रिलीज करण्यात आली नसल्याने आरोपी संख्या व नाव पत्ता समजु शकलेला नाही.पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिस करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे