Breaking
ब्रेकिंग

लग्नाच्या दोन दिवस आधी नवरी मुलीचे अपहरण ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

0 8 9 8 7 7

लग्नाच्या दोन दिवस आधी नवरी मुलीचे अपहरण ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

राहुरी (प्रतिनिधी) – प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे

 

राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात विवाहाची जोरदार तयारी सुरू असतानाच लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी २० वर्षीय नवरी मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मेहंदी काढण्यासाठी घरातून बाहेर पडलेली तरुणी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून न आल्याने अखेर राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित २० वर्षीय तरुणीचा विवाह दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी निश्चित झाला होता. लग्नाची घरात जोरदार तयारी सुरू होती. गेल्या आठ दिवसांपासून ती जवळच राहणाऱ्या आजी-आजोबांच्या घरी वास्तव्यास होती.
दरम्यान, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या आईला फोन करून मेहंदी काढण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी पोहोचली नाही. त्यामुळे कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
त्यानंतर तरुणीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड पुढील तपास करीत आहेत. लग्नाच्या दोन दिवस आधीच नवरी मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे