तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडुंचे घवघवीत यश

तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडुंचे घवघवीत यश
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २३/ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील खेळाडुंनी घवघवीत यश प्राप्त केले.
विजेते खेळाडू:-
1) देवराज सतीश कन्हेरे, इयत्ता 7 वी
2)स्वराज सुनिल पवार, इयत्ता 8 वी
3) शंभुराजे कन्हेरे
4) विराज पठारे
5) कृष्णा मेरूकर, 12 वी
या सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून यश संपादन केले आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. सचिन दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन मा. आ. श्री जयवंतराव जगताप साहेब, मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त श्री शंभुराजे जगताप, प्राचार्य श्री अनिस बागवान, पर्यवेक्षक श्री महेश कांबळे, पर्यवेक्षीका सौ. नवले मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर, कर्मचारी यांनी गुलाब पुष्प देऊन खेळाडूचे अभिनंदन केले तर आभार मुलाणी सर यांनी मानले.
तसेच सर्वांना पुढिल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


