एम .आय .डी . सी . मार्गे एस्. टी. च्या गाड्या सुरू
एम .आय .डी . सी . मार्गे एस्. टी. च्या गाड्या सुरू
प्रतिनिधी : राजेश बाष्टे
अलिबाग (३०) M. I. D, C. च्या पेझारी ते जळपाडा या रस्तामार्गे एस्. टी. बसेस दि. २८ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आल्या आहेत . रेवस – M,l. D. C. मार्गे पनवेल ही गाडी रेवास येथून सकाळी ०८. २० वाजता व पोयनाड M,I. D, C, अलिबाग ही गाडी सायंकाळी ४.-१० वाजता सुटेल अशी माहिती विभागीय नियंत्रक श्री . घोडे यांनी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना दिली .
श्री बळवंत वालेकर यांच्या प्रयत्नामुळे १९९० पासू न M,I. D, C मार्गे एस्. टी. गाड्या सु रु झाल्या. होत्या.. पण कोरोना महामारीच्या काळात त्या बासेस बंद करण्यात आल्या. सदर बसेस पुन्हा सुरू होण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले.पण व्यर्थ , शेवटी मागील महिन्यात ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोलीने ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांच्या नेत्रुत्वाखाली “रास्तारोको” जाहीर केला . त्या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी , पोलिस अधिक्षक , सहा. पो. निरीक्षक पोयनाड व विभागीय नियंत्रक रा. प. रायगड विभाग पेण यांना देण्यात आल्या, म्हणून जिल्हा प्रशासन जागे झाले. रास्तारोको” कार्यक्रम न होण्यासाठी आंदोलकांसह संबंधितांच्या बैठका वाघोली व पोयनाड पोलिस ठाणे येथेहौऊन आंदोलकांच्या मगण्या मान्य असल्याचे लेखी पत्र ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना देण्यात आले. त्यामुळे या मार्गावर वरील गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर , उपाध्यक्ष नंदकुमार पाटील , सेक्रेटरी दत्तात्रेय नांदेकर , प्रकाश जोमा पाटील , चंद्रकांत वालेकर इ,नी विशेष प्रयत्न केले. या एस्. टी. बसेसमुळे २५ गावांतील विद्यार्थी व दैनंदिन प्रवासी फायदा घेत आहेत .