Breaking
ब्रेकिंग

अवैध वेश्याव्यवसायाला विरोध केल्याने रुईछत्तीसी ग्रामस्थांना मारहाण

0 8 6 5 1 6

अवैध वेश्याव्यवसायाला विरोध केल्याने रुईछत्तीसी ग्रामस्थांना मारहाण

अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):- शिवा म्हस्के

नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावातील राज्यभर गांजलेला वेश्याव्यवसाय विषय पुन्हा वेगळ्या वळणावर आला आहे.वेश्याव्यवसाय चालक मालक तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून रुईछत्तीसी मधील वेश्याव्यवसाय विरोधात उपोषण केलेल्या तरुणा आणि ग्रामस्थांना आता खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी षंडयंत्र रचत आहे. वेश्याव्यवसाय विरोधात उपोषणाची दखल खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सह नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार ‌विक्रम पाचपुते यांनी दखल घेऊन विधान सभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी मागणी केल्याने आता वेश्याव्यवसाय दुकानदारी सिल होण्याच्या उंबरठ्यावर आल्याने अवैध वेश्याव्यवसायाला हवालदिल झाले कटकारस्थान रचून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एक वरिष्ठ अधिकारी वेश्याव्यवसाय सुरू राहु द्या तक्रार अर्ज मागे घ्या ॲट्रॉसिटीच गुन्हा माग घेण्यासाठी तडजोड करण्याच्या सल्ला देत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

या घटनेमुळे रुईछत्तीसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास गावातील रवी शिंदे, उमेश शिंदे, सागर जगदाळे, राजेंद्र शिंदे व उमेश कुठे हे नगर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन घरी परतत असताना रस्त्यावर बसलेल्या काही व्यक्तींनी त्यांना अडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशांत छत्तीसे, गणेश छत्तीसे, निर्मला छत्तीसे, भैया गोरे, शोभा गोरे, दिलीप गोरे व अभिजित गोरे यांनी गाडीतून ओढून काढत “ग्रामसभेत बोलून आमचा व्यवसाय बंद पाडला” असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच उपस्थित ग्रामस्थांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील सुमारे २० हजार रुपये काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेबाबत गावातील अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अवैध कृत्यांना विरोध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी सदर प्रकरणी एसआयटी स्थापना करून सर्व अवैध व्यवसायाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी रुईछत्तीसी ग्रामस्थांच्या मागणी आहे.

वेश्याव्यवसाय विरुद्ध उपोषणकर्ते सागर जगदाळे यांच्या तक्रारीवरून दि.७ मार्च रोजी ,०१८२/२०२६ भारतीय न्याय संहिता२०२३ कलम ११८(१), ११९(१), ११५(२),३५२,३५१(१),१२६(१),१९१(२),१९०,१८९(२), अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५) प्रमाणे ७५ दाखल करण्यात आली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे