Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची शैलेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

0 3 9 0 2 2

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची शैलेश राणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

प्रतिनिधी :- पंकज पाटील

भुसावळ :-नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे माजी विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भुसावळ येथे सदिच्छा भेट दिली. कौटुंबिक साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ते शहरात आले असता जळगाव जिल्हा जुनियर कॉलेज शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सौ. कांचन राणे (उपशिक्षिका, के. नारखेडे विद्यालय), चिरंजीव अवनीश शैलेश राणे, के. नारखेडे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. वाय. एन. झोपे सर, उपशिक्षक श्री. सुनील पाठक, तसेच मिलिंद पाटील (जुक्टो संघटना प्रतिनिधी, रावेर तालुका) आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान शिक्षण, शिक्षक संघटनांचे प्रश्न तसेच सामाजिक कार्य याविषयी चर्चासत्र झाले. शिक्षकांचे हित आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतील अशा विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे