Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती करिता घेतलेल्या स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांचा स्वातंत्र्यदिनी मा . तहसीलदार ,पोलीस निरीक्षक ,गटशिक्षणाधिकारी राहुरी यांच्या हस्ते सन्मान*

0 8 6 6 6 2

*राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती करिता घेतलेल्या स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांचा स्वातंत्र्यदिनी मा . तहसीलदार ,पोलीस निरीक्षक ,गटशिक्षणाधिकारी राहुरी यांच्या हस्ते सन्मान*

राहुरी तालुका जावेद शेख

. अमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्य साधून राहुरी पोलीस स्टेशन पुरस्कृत अमली पदार्थ जनजागृतीच्या दृष्टीने आंतरशालेय निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .
सदर स्पर्धांमध्ये तालुक्यातील सुमारे 9000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता .
शिक्षण विभाग पंचायत समिती मार्फत आज रोजी सदर स्पर्धेचा निकाल घोषित होऊन *दोन्ही स्पर्धेमधील दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली .
सदर गटातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान स्वातंत्र्यदिनी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मा . तहसीलदार श्री नामदेवराव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,तसेच गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला ।आहे तसेच राष्ट्रीय अमली पदार्थ विशेष दिनाच्या अनुषंगाने दिनांक 14 15 16 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये रॅली प्रभात फेरी चे आयोजन केले असून मुलांच्या निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेत आहोत सदर स्पर्धेकरिता पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी श्री मोनिराज तुंबारे व सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे .
सदर बक्षीस वितरण कार्यक्रम हा माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब , माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात होणार आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे