जागतिक आरोग्य दिनानिमित्त लोणखुर्द ग्रामपंचायत मार्फत २८ जणांचे रक्तदान व ३०० जणांची चाचणी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त लोणखुर्द ग्रामपंचायत मार्फत २८ जणांचे रक्तदान व ३०० जणांची चाचणी
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर: अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त लोणखुर्द ग्रामपंचायत, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि जीवन ज्योती रक्तपेढी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व रक्तगट चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीरात एकूण २८ नागरिकांनी रक्तदान केले तर जवळपास ३०० नागरिकांची रक्तगट चाचणी मोफत करून देण्यात आली. शिबिराचे उदघाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर कृउबा समिती सभापती अशोक पाटील, मार्गदर्शक म्हणून डॉ. जे. टी. शिंदे, डॉ.विजयकुमार ठाकरे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. भिकनराव पाटील, डॉ. योगेश महाले उपस्थित होते. या शिबिरात भटू पाटील, अशोक पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, हर्षल शिंदे, संदीप भील, यशवंत पाटील, मनोज पाटील, विकास शिंदे, आदित्य शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रमेश पाटील, मुरलीधर पाटील, खुशाल पाटील, डॉ. विजयकुमार ठाकरे, सुनिल पाटील, निखिल पाटील, विनोद पाटील, भगवान पाटील, देवेंद्र पाटील, भिकन पाटील, कैलास पाटील, बापूराव मोरे, दीपक पाटील, रामकृष्ण पाटील, मा. सभापती अशोक पाटील, शशिकांत पाटील, सीमा पाटील यांनी रक्तदान केले.