Breaking
ब्रेकिंग

द रॉयल ग्रुप च्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदी पूजा तापडिया यांची निवड*

0 8 6 7 0 5

*द रॉयल ग्रुप च्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदी पूजा तापडिया यांची निवड*

राहुरी तालुका जावेद शेख

द रॉयल ग्रुप च्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदी सौंदर्यवती मी महाराष्ट्राची विजेती व फॅशन डिझायनर असलेली पूजा तापडिया यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या रॉयल ग्रुप सोबत एकनिष्ठ असून त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे. पूजा तापडिया यांची निवड ही तीन वर्षां च्या कालावधी साठी करण्यात आली आहे अशी माहिती रॉयल ग्रुप चे डायरेक्टर नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पूजा तापडिया या पुणे येथील असून एक उत्तम अश्या फॅशन डिझायनर आहे. व्हॅलेंटाइन ड्रीम वेअर हे शॉप पुणे येथे आहे. द रॉयल ग्रुप च्या बहुचर्चित अश्या सौंदर्यवती मी महाराष्ट्रा च्या विजयी पदाची माळ गळ्यात पडल्या नंतर त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून रॉयल ग्रुप सोबत पुढे काम करणार असल्याचे पूजा तापडिया यांनी सांगितले. द रॉयल ग्रुप च्या सर्वोच्च पदी म्हणजेच रॉयल ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदी पूजा तापडिया यांची निवड झाली आहे. मिळालेले हे अतिशय मानाचे पद असून त्याचा योग्य उपयोग करणार असल्याचे पूजा यांनी सांगितले. पूजा तापडिया यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्ह्यातील महिला व मुली व किड्स ची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदासाठी निवड केली जाणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे पत्रकार जावेद शेख, रॉयल ग्रुप डायरेक्टर नितीन झगरे, बिग बॉस फेम तृप्ती ताई देसाई, ममता भोई दौंडे , सुमिता शिंदे, नमिता पाटील, आकाश रणदिवे यांनी अभिनंदन केले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे