Breaking
ब्रेकिंग

मा.ना. दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0 3 9 0 2 6

मा.ना. दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 वृत्तसेवा /  प्रतिनिधी :  जावेद शेख

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, मालेगाव येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, देशातील युवकांनी शिक्षण आणि ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी करावा, असे आवाहन केले.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांनी संकुलाने प्राप्त केलेल्या यशांचा आढावा सादर केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी संकुलाचे योगदान स्पष्ट केले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांनी शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी संकुलाचे महत्त्व अधोरेखित करत, “या संकुलाने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवीन दिशा देण्याची क्षमता आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच संकुलाच्या भावी उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संकुलातील पाच महाविद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना.भुसे साहेब यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कृषीदर्शनी तसेच कृषी मार्गदर्शिका भेट देऊन अभिनंदन केले.

कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलातील प्राध्यापक डॉ. सोमनाथ सोनवणे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. विवेक कानवडे, संकुलाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संजय पाटील, विद्या शाखाप्रमुख डॉ. दिनेश बिरारी, सहाय्यक कुलसचिव श्री नारायण पाठक, सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल खुळे, डॉ. प्रशांत सोनवणे आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे