आई कमलाभवानी चरणी सचिन म्हस्के ( मिरजगाव ) यांच्या वतीने घड्याळ अर्पण

आई कमलाभवानी चरणी सचिन म्हस्के ( मिरजगाव ) यांच्या वतीने घड्याळ अर्पण
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३/ गुरुवार दिनांक ०१.०५.२०२५ रोजी सचिन बाजीराव म्हस्के रा. मिरजगाव यांचे कडून करमाळ्याची कुलस्वामिनी श्री कमला भवानी मातेच्या चरणी घड्याळ अर्पण करण्यात आले. मंदिर समिती तर्फे या निमित्त सचिन म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंदिर पुजारी रोहित पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, पत्रकार सूर्यकांत होनप, पत्रकार तुषार जाधव, अशोक गाठे व्यवस्थापक, भक्तगण, सेवेकरी, मानकरी इं. उपस्थित होते.
करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन आता भाविकांना मिळणार आहे. त्या अनुषंगाने करमाळा येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधाही उपलब्ध आहे.
*देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे (व्यवस्थापक) मो. नं. ९४०४७०८९२४*