चांडगाव ते पोमलवाडी, पुलाचा मा. आ. संजयमामा शिंदे यांनी पुर्वीच सादर केलेल्या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळणार:- ॲड. अजित विघ्ने

चांडगाव ते पोमलवाडी, पुलाचा मा. आ. संजयमामा शिंदे यांनी पुर्वीच सादर केलेल्या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळणार:- ॲड. अजित विघ्ने
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १४/ सोलापुर जिल्हयातील करमाळा तालुका व पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्याच्या मधुन भिमा नदीचे विस्तिर्ण पात्र असुन दोन्ही बाजुचे किनाऱ्यावरून चांडगाव ते पोमलवाडी, वाशिंबे ते गंगावळण व कुगाव ते शिरसोडी दरम्यान बोटीतुन प्रवासी वहातुक होते. चांडगाव ते पोमलवाडी या ठिकाणी ऊजनीवरील सर्वात कमी अंतर (७०० मीटर) असुन दोन्ही बाजुला ॲप्रोच रस्ते आहेत. लोणी देवकर येथे राष्ट्रीय महामार्ग असुन केत्तुर, पारेवाडी रेल्वे स्टेशन येथुन मध्य रेल्वेचा मार्ग आहे. हा पुल झाल्यास शिखर शिंगणापुर ते तुळजापुर तसेच शिखर शिंगणापुर ते चौंडी हा पर्यटन मार्ग करमाळा (कमलादेवी) मार्गे अस्तित्वात येणार असुन यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे मराठवाडा कनेक्शन होणार आहे.
या पुलाची मागणी गेली अनेक वर्षांपासुन होत असुन माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी पुलाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनाही दिलेला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे, मात्र कुगाव शिरसोडी दरम्यान झालेला बोटीचा अपघात पाहुन महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी कुगाव ते शिरसोडी च्या पुलास मंजुरी दिली होती व त्याचे कामही प्रगती पथावर आहे. यानंतर गोयेगाव ते आगोती (अंदाजे १४५० मीटर) अंतरात पुल व्हावा अशी देखिल मागणी होत असुन, चांडगाव ते पोमलवाडी या पुला करीता अर्थसंकल्प २०२३ व पुरवणी अर्थसंकल्प २०२४ मधे प्रस्ताव मंजुरी करीता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रयत्न केले होते, परंतु निधी अभावी सदरचा पुल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
इंदापुरचे आमदार व मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखिल विधानसभा निवडणुक २०२४ मधे त्यांचे निवडणुक अजेंडयात चांडगाव ते पोमलवाडी पुल साकारणार असल्याचे अभिवचन दिलेले असुन, या ठिकाणी पुल उभारण्या बाबत राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी देखिल तशी घोषणा विविध कार्यक्रमातुन केली आहे. सदरच्या पुलाचे व दोन्हीकडील रस्त्यांचे सर्व्हेक्षण होऊन या पुलाचे मंजुरीची चालु पावसाळी अधिवेशनात खात्री असुन, हा पुल विकासाचा राजमार्ग ठरणार आहे.
करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी या पुलाचे कामाबाबत सार्व बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली असुन, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बातमी प्रसिद्धीस दिली आहे. यावरून माजी आमदार शिंदे यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस करमाळाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिलेली पत्रे, प्रस्ताव तसेच मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेली कार्यवाही याचे माहितीसह स्पष्टीकरण दिले आहे.