महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आ. संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १०/ करमाळा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आ. संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. संजयमामा शिंदे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करणार असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी यावेळी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील प्रशासनावर वेळोवेळी आवाज उठवणारे आंदोलन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापू यांचा करमाळा तालुक्यातील प्रशासनावर मोठ्या प्रमाणात वचक असून संजय बापू घोलप मनसेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, युवक, युवती, व्यापारी, वृद्ध नागरिक, महिला यांच्या अडचणी त्याचबरोबर अनेक प्रश्न सोडवण्याचे काम करत असतात. त्यांच्या या कार्यामुळे संजय बापू घोलप यांच्या पाठीमागे असंख्य शेतकरी युवक, युवती, व्यावसायिक, वृद्ध नागरिक असा मोठा जनसमुदायआहे. संजय बापू घोलप यांनी पाठिंबा दिल्याने याचा फायदा संजय मामा शिंदे यांना नक्की होणार आहे. करमाळा तालुक्यातील नागरिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेसाठी कोणती भूमिका घेणार ? कोणाला पाठिंबा देणार ? याची प्रतीक्षा करत होते. संजय बापू घोलप यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन शनिवार दि.९ नोव्हेंबर रोजी केमिस्ट भवन येथे संजय मामा शिंदे यांना पाठिंबा संदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि सर्वांच्या विचाराने करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संजय मामा शिंदे हेच योग्य आहेत म्हणून संजय बापू घोलप यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की , करमाळा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे आणि मागील पाच वर्षात बराचसा काळ कोरोना मध्ये व अस्थिर सरकार मध्ये गेला. त्यातून भेटलेल्या वेळेमध्ये मी जास्तीत जास्त निधी करमाळा मतदारसंघासाठी उपलब्ध केला. पुढील पाच वर्ष जर मला मिळाले तर करमाळा मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा असे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन दिले .
यावेळी आ. संजय मामा शिंदे तसेच मनसेचे संजय बापू घोलप, नानासाहेब मोरे, सतीश फंड, सचिन कणसे, अमर करंडे तसेच कन्हैयालाल देवी, विवेक येवले, विनय ननवरे व मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.