दहावी अन् बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जात सत्कार*
वसंतनगर येथील आश्रम शाळेतील शिक्षकांचा उपक्रम

*दहावी अन् बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जात सत्कार*
*वसंतनगर येथील आश्रम शाळेतील शिक्षकांचा उपक्रम*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
पारोळा : तालुक्यातील वसंतनगर येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व पालकांचा घरोघरी जात शिक्षक व कर्मचारी यांनी सत्कार केला.नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा नव्या जोमाने प्रत्येक विद्यार्थ्याने तयारीला लागून त्याने आपल्या क्षमता वाढवाव्यात व अधिक यश प्राप्त करावे, यासाठी येथील शिक्षक व कर्मचारी यांनी वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठे येथील विद्यार्थ्यांच्या घरी जात त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका एल. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, बी. पी. पाटील, डी. एस.
पाटील, एम. डी. सूर्यवंशी, के. आर. पाटील, आर. सी. चौधरी यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक, ज्यूनियर कॉलेजचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जात विद्यार्थी, माता पालकांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठे येथील ग्रामस्थांनी या शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुकही केले.