जि.प.प्राथमिक शाळा नांद्रीच्या प्रवेशद्वार जवळ असलेला उकिरडा बाजुला करावा अन्यथा . . . आंदोलन करणार – – महेंद लक्ष्मण नागेश
गट विकास अधिकारी अमळनेर यांच्याकडे वारंवार निवदेन देऊनही दुर्लक्ष
जि.प.प्राथमिक शाळा नांद्रीच्या प्रवेशद्वार जवळ असलेला उकिरडा बाजुला करावा
अन्यथा . . . आंदोलन करणार – – महेंद लक्ष्मण नागेश
गट विकास अधिकारी अमळनेर यांच्याकडे वारंवार निवदेन देऊनही दुर्लक्ष
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर तालुक्यात नांद्री गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, या घाणीमुळे शाळेत येणाऱ्या चिमुकल्या बालकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतांना दिसत आहे.
यामुळे पालक वर्ग आपल्या पाल्यांना शाळेत पाठवता नसल्यामूळे मुलांमूलीचे शैक्षणिक नुकसान होत
आहे. शाळेचे मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांना वेळोवेळी तोंडी सूचना व निवेदन देऊनही अद्याप हे उकिरडे उचलले जात नाहीत.
महेंद लक्ष्मण नागेश रा.नांद्री कायमस्वरुपी गावातील नागरिक यांनी वेळोवेळी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा दोषीवर कार्यवाही करण्यात आलेली यांचा अर्थ महेंद लक्ष्मण नागेश रा.नांद्री यांच्यासांगण्यानूसार गट विकास अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत.सदर बाब हि अत्यंत गंभीर स्वरुपाची असून या कडे प्रश्नाने लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावी व दोषीवर कार्यवाही करावी.



