८० फुटाचे रस्त्याचे काम अपूर्ण ; नागरिक त्रस्त – – दिपक पाटील यांनी घेतली दखल

८० फुटाचे रस्त्याचे काम अपूर्ण ; नागरिक त्रस्त – – दिपक पाटील यांनी घेतली दखल
*यंदाही अवकाळी पाऊस तर चिखलामुळे नागरिकांचे हाल*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरातील राम नगर परिसरातील ८० फुटी रस्त्याचे काँक्रीटीकरण काम रखडले असून त्यातच पाणीपुरवठा योजनेचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने काळी माती वर येऊन अवकाळी पावसामुळे चिखल झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. सदर काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या असून आठ दिवसात काम सुरू न झाल्यास नोटीस देण्यात येईल. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील जाण्या येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस अनेक दिवसा पासून सुरू झाला होता. तरी देखील नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. नाहीतर अशा प्रकारची समस्या निर्माण झाली
नसती.महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी माहिती दिली आहे.नागरिकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भालेराव नगर- राम नगर परिसरात ८० फुटी नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम थांबले आहे. ठेकेदाराने क्राँकीट रस्त्यावर वाहने चढ-उतार व्हावी म्हणून काळी माती टाकून उतार चढाव करून दिला.मात्र तोच उतार चढाव पाऊस पडल्याने वाहन धारकांचे हाल पाहत आहे. चढावर मुरुम टाकावा की काळी माती याबाबत संबंधित ठेकेदाराला नगरपरिषदेने समज द्यावी अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत.सहा महिन्यापासून सदर काँक्रीटीकरण जैसे थे असून संबंधित ठेकेदाराला नगरपरिषदेने समज द्यावी व तात्काळ काम सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम या भागात सुरू असून खोदकामामुळे काळी माती वर आल्याने त्यातच अवकाळी पावसाची भर पडल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर कसरत होत आहे. त्याठिकाणी मुरूम टाकण्याची व्यवस्था पालिकेने करावी. राम नगर व परिसरात ही नागरिक राहत असून रस्त्याचे काम होईपर्यंत यंदा वाहनधारकांचे हाल होऊ नये म्हणून रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा.